अभिनेता रणवीर सिंग बाप होण्यासाठी फारच ‘Excited’!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपली दमदार अ‍ॅक्टींग आणि स्टाईलच्या जीवावर लोकांच्या मनात घर करणाऱ्या अ‍ॅक्टर रणवीर सिंगनं आपल्या पर्सनल लाईफला घेऊन अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. नुकताच पत्नी दीपिका पादुकोण सोबत त्यानं लग्नाचा वाढदिवसही साजरा केला आहे. एका टॉक शोमध्ये बोलताना रणवीरनं भविष्याबद्दल चर्चा केली आहे.

रणवीर सिंग म्हणाला, “मला वाटतं की माझीही मुलं असावीत. माझी अशीही इच्छा आहे की, मी त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करावा.” असे म्हणत त्यानं भविष्यात बाप होण्याबाबत चर्चा केली. त्याच्या बोलण्यावरूनच कळत होतं की, तो बाप होण्यासाठी किती एक्सायटेड आहे.

आपल्या फिल्मी करिअरबद्दल बोलताना रणवीर सिंग म्हणाला, “मला अ‍ॅक्टींग व्यतिरीक्त सिनेमा डायरेक्ट करण्याचीही इच्छा आहे. मला लिखाणाचाही छंद आहे. मी काही ना काही लिहत असतो. मला डीजेदेखील व्हायचं आहे. याशिवाय मला एखाद्या बीचवर दीर्घकाळ वेळही घालवायचा आहे.” असंही रणवीर म्हणाला.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो आपाला आगामी सिनेमा 83 मध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे.

यात रणवीर लेजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका यांचा हा पहिला सिनेमा आहे. 10 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

Extra gluten, please

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like