‘तान्हाजी’मध्ये जो दाखवला तो इतिहास नाही, खरा इतिहास मला माहितीये’ : सैफ अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सिनेमानं 150 कोटींचा आकडाही सहज पार केला आहे. अजून या सिनेमाची कमाई थांबायचं नाव घेत नाहीये. अजूनही सिनेमाची कमाई सुरूच आहे. असं असलं तरी सिनेमाबद्दल बोलताना काहींनी इतिहासासोबत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. या सिनेमात उदयभान राठोडची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खाननंही सिनेमावरील राजकारणावर भाष्य केलं आहे. सिनेमाला घेऊन अभिनेता म्हणून समस्या नाही परंतु व्यक्ती म्हणून आहे असं तो म्हणाला आहे.

‘इतिहास काय आहे हे मला चांगलं माहिती आहे’
सिनेमातील काही ऐतिहासिक घटनांशी छेडछाड किंवा बदल करण्यात आल्यासंबंधी विचारलं असता सैफ म्हणाला, “काही गोष्टींमुळे मी मत मांडत नाही. कदाचित पुढच्या वेळी मांडेन. ही भूमिका खूप सुंदर होती. त्यामुळे ती करण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु लोक जेव्हा म्हणतात की, इतिहास हाच आहे तर मला असं वाटत नाही. इतिहास काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. इंग्रज भारतात येण्याआधी भारत ही संकल्पना नव्हती.” असंही तो म्हणाला.

‘लोकांना खरा इतिहास सांगणारी भूमिका करायला आवडेल’
पुढे बोलताना सैफ अली खान म्हणाला, “लोकांना हेच आवडत आहे म्हणून ही संकल्पना चालली. परंतु वास्तवात मला अशा इंडस्ट्रीचा भाग व्हायला आवडेल जे एखादी भूमिका घेतील. जे लोकांना खरा इतिहास सांगतील. त्याच्यासोबत छेडछाड करणार नाही. परंतु लोक म्हणतात हेच चालतं. ही एक नवी संकल्पना आहे जी हिट ठरत आहे. परंतु ही गंभीर बाब आहे.” असं मतही त्यानं व्यक्त केलं.

‘धर्मनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहेत’
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर बोलताना सैफ म्हणाला, “देशातील सध्याची स्थिती पाहिली तर आपण धर्मिनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहोत असं वाटतं. त्याच्यासाठी कोणीही लढत नाही. अभिनेता म्हणून कोणतीही भूमिका घेणं माझ्यासाठी योग्य नाही. कारण यामुळे माझ्या सिनेमांवर बंदी येऊ शकते. याचा परिणाम कमाईवर होऊ शकतो. बॉलिवूड कलाकारांना आपला व्यवसाय आणि कुटुंब संकंटांपासून दूर ठेवायचं असल्यानं राजकीय प्रतिक्रिया देता येत नाहीत.” असंही तो म्हणाला.

लोकशाहीसाठी बॉलिवूड लढत नाही.
सैफ म्हणतो, “लोकशाहीसाठी इंडस्ट्रीतील कोणालाही मी भांडताना पहात नाही. परंतु विद्यार्थी लढत आहेत. बॉलिवूडमधील कोणीही भूमिका घेत नाही. कदाचित त्यांना सिनेमावर बंदी येण्याची भीती असते.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !