‘भाईजान’ सलमानचा ड्रायव्हर आणि 2 स्टाफला ‘कोरोना’ची लागण ! स्वत:ला केलं आयसोलेट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा ड्रायव्हर आणि 2 स्टाफला कोरोना (Covid-19) झाला आहे. त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता सलमान खाननं स्वत:ला आयसोलेट केलं आहे.

सलमान खान सध्या खूप व्यस्त आहे. बिग बॉस 14 ला होस्ट करत आहे. अशात सलमान खान आगामी काही एपिसोडमध्ये दिसेल की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, सलमानच्या ड्रायव्हरचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळी यातील 2 स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर आता सलमान खाननं स्वत:ला आयसोलेट केलं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख पठाण सिनेमातही दिसणार आहे.