मी फक्त ‘त्या’ पक्षांचा : अभिनेते सयाजी शिंदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे हे सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. दौंड तालुक्यातील पडवी गावच्या माळरानावर सह्याद्री देवराई आणि एक मित्र एक वृक्ष च्या प्रयत्नातून वृक्ष लागवड उपक्रमास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाला सयाजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात ते म्हणाले, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाहीये. तर मी झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा आहे. असे भाष्य त्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी केले.

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचे केले कौतुक
मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मात्र झाडांवर उडणाऱ्या पक्षांचा असल्याचे मत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. राज्य शासन अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. ते देशासाठी फायद्याचेच आहे. झाडे लावणे हे उपक्रम लोक चळवळीमधून उभे राहिले पाहिजे. अशी त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली. केवळ झाडे लावून न थांबता झाडांचे दरवर्षी वाढदिवस साजरे करायला हवेत. असे वाढदिवस साजरे करायला मी स्वतः येईन असे आश्वासनही त्यांनी दिले. अधिकाधिक झाडे लावण्यासाठी त्यांनी युवकांना प्रोत्साहित केले. पुढच्या काळात पडवीच्या देवराईत वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार असल्याचे सह्याद्री देवराई आणि एक मित्र एक वृक्ष च्या आयोजकांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.

थर्टी फर्स्ट टाळून शिंदेंचं झाडांसाठी श्रमदान
नवीन वर्षाचे स्वागत लोकं उत्साहाने करतात. तर अनेक लोकं पार्टी साजरी करतात. परंतु सयाजी शिंदे या अभिनेत्यांनी दिवडी गावाच्या शिवारात २०१६ मध्ये लावलेल्या आठ हजार झाडांसाठी श्रमदान करून थर्टी फर्स्ट साजरा केला होता. शिंदे ज्या सह्याद्री देवराई या संघटनेसाठी काम करतात त्या, संघटनेने जून महिन्यात तब्बल आठ हजार झाडे लावली होती. हि झाडे ज्या ठिकाणी लावण्यात अली होती त्या ठिकाणी राहत असलेल्या शालेय मुलांनी एकत्र येऊन माळरानावर श्रमदान केले होते. रोपट्यांच्या भोवती आळे करण्यात आले होते. केवळ वृक्षारोपण करून न थांबता येथील तरुणाईने त्या झाडाची वेळोवेळी योग्य काळजीही घेतली. नवीन वर्षाचे स्वागत करण्याबरोबर ते केवळ पार्टी करूनच होत नसते तर निसर्गाने आपल्यावर अनेक उपकार केले आहेत. त्यापैकी काही उपकारांची परतफेड नक्कीच करता येईल. झाडे लावणे आणि ती जगवणे हे एक त्यापैकीच कार्य आहे असे सयाजी शिंदे म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like