Video : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनच्या सल्ल्यानंतर ‘बाजीगर’ शाहरूखन दिलं ‘फिश करी’चं ‘आमंत्रण’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत २७ वर्षांची यशस्वी कारकिर्द पूर्ण केली. यानिमित्त शाहरुखने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओला रिट्विट करत चाहत्यांनी शाहरुखच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान बाईक चालवताना दिसून येत आहे. शाहरुख खान या व्हिडिओत हेल्मेट न घालता बाईक चालवत असल्यामुळे सचिन तेंडुलकरने शाहरुख खानला हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला. आता सचिनच्या या सल्याला शारुखने हटके शैलीत उत्तर दिले आहे.

 

फिश करीचे आमंत्रण

शाहरुख ट्विट करून लिहिले की, ‘माझ्या मित्रा, हेल्मेट परिधान करुन, ऑन ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह आणि स्ट्रेट ड्राइव्ह करणे तुमच्यापेक्षा कोण शिकवू शकतं. मी माझ्या नातवांनाही सांगू शकतो की, मला गाडी चालवण्याचे धडे खुद्द महान सचिन तेंडूलकरने दिले आहेत. आपण लवकरच फिश करी खाण्यासाठी भेटू. धन्यवाद’.


सचिनचा काय होता सल्ला ?

शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडिओत त्याने हेल्मेट परिधान न केल्याने सचिनने त्याला बाजीगर संबोधत सल्ला दिला होता. सचिनने म्हटले होते, ‘प्रिय बाजीगर, हेल्मेट परिधान करायचे विसरू नको, जोपर्यंत आयुष्य असेल, तोपर्यंत हेल्मेट परिधान करायला विसरु नको. सिनेसृष्टीत २७ वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. लवकरच भेटू.’

 

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

जाणून घ्या : योग्य ‘परफ्युम’ची निवड आणि वापर कसा करावा

आता ‘एक देश, एक ड्रायव्हिंग लायसन्स’

संजू ‘बाबा’, सलमान ‘भाई’ यांच्यासह ‘या’ टॉप ५ कलाकारांच्या झाल्या ३०० हून अधिक ‘गर्लफ्रेंड्स’