सोनू सूदनं शेअर केला सर्वात ‘क्युटेस्ट’ न्यूज अँकर्सचा व्हिडीओ ! मुली म्हणाल्या – ‘रिअल लाईफ Hero’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनूनं स्वत:च्या खर्चानं आजवर हजारो कामगारांना घरी सुखरूप पोहोचवलं आहे. मुख्यमंत्र्यांपासून तर राज्यपालांपर्यंत सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. सोशलवर सध्या सोनूचीच चर्चा आहे. त्याचं कौतुक करणाऱ्या आणि सोशलवर आपली अडचण सांगणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना तो रिप्लाय देखील करत आहे.

अशात सोनूनं दोन सर्वात क्युट न्यूज अ‍ॅकर्सचा व्हिडीओ सोशलवरून शेअर केला आहे. यात दोन लहान मुली दिसत आहे. या मुली सोनूचं कौतुक करत आहेत. सोनूनं नुकताच त्याच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये सोनू म्हणतो, “आतापर्यंतच्या सर्वात क्युटेस्ट अँकर. कोणीच तुमच्या चॅनलच्या टीआरपीला हरवू शकत नाही.”

व्हिडीओत दिसत आहे की, पूर्ण भारत सोनूचा फॅन झाला आहे असं त्या मुली सांगत आहेत. अनेकजण त्यांची तुलना देवाशी करत आहेत. ते रिअल लाईफ हिरो आहेत. वी लव यु सोनू अंकल असंही त्या म्हणत आहेत. सोनूनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही स्माईल केल्याशिवाय रहणार नाही. अनेकांनी यावर कमेंट करत सोनूचं आणि त्या मुलींचं कौतुक केलं आहे.