‘बाजीराव मस्तानी’, ‘राम लीला’, ‘आशिकी 2’ सह ‘हे’ 8 मोठे सिनेमे आधी सुशांतला ऑफर झाले होते ! ‘या’ कारणामुळं नाही केलं काम

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडसह पूर्ण देश हादरला होता. त्याच्या निधनानंतर असंही बोललं गेलं की, त्यानं साईन केलेले सिनेमे काढून घेण्यात आले होते. आज आपण त्या सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत जे आधी सुशांतला ऑफर झाले होते. यात अनेक बड्या सिनेमांचा समावेश आहे.

1) आशिकी 2 – या सिनेमासाठी सुशांतनं ऑडिशन दिलं होतं. सर्वकाही ठिक चाललं होतं. परंतु शेवटी सर्वकाही आलबेल नव्हतं आणि आदित्य रॉय कपूरनं त्याला रिप्लेस केलं.

2) गोलियों की रासलीला राम-लीला – डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं होतं की, या सिनेमासाठी आधी सुशांतला कास्ट करण्यात आलं होतं. परंतु त्यांचं यश राज फिल्म्ससोबत असोसिएशन असल्यानं सुशांतनं हा सिनेमा साईन केला नाही.

3) बाजीराव मस्तानी – संजय लीला भन्साळींच्या या सिनेमातही त्यांना सुशांतला घेण्याची इच्छा होती. परंतु त्यावेळी सुशांत पानी या सिनेमावर काम करत होता. त्यामुळं तो हा सिनेमा करू शकला नाही.

4) फितूर – अभिषेक कपूरचा हा सिनेमा आधी सुशांतला दिला गेला होता. परंतु त्याच्या बिजी शेड्युलमुळं तो हा सिनेमा करू शकला नाही.

5) बेफिक्रे – या सिनेमाबद्दल सुरुवातीपासूनच असं बोललं जात होतं की, आदित्य चोपडा या सिनेमात सुशांतलाच घेतील. परंतु अंस काहीच झालं नाही.

6) हाफ गर्लफ्रेंड – प्रसिद्ध लेखक चेतन भगतचं पुस्तक हाफ गर्लफ्रेंडवर आधारीत या सिनेमापासूनही सुशांत वेगळा झाला होता. याचंही कारण डेट्स मॅच न होणं हे होतं.

7) रोमियो अकबर वॉल्टर – या सिनेमाचे डायरेक्टर रॉबी ग्रेवाल यांनी सांगितलयं की,या सिनेमासाठी सुशांतनं डेट्स दिल्या होत्या. परंतु त्या डेट्स क्लॅश होत होत्या. यामुळं तो सिनेमाचा हिस्सा काही बनू शकला नाही.

8) सारे जहां से अच्छा –भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी आमिर खान, शाहरुख खान, विकी कौशल, सलमान खान अशी अनेक नावं समोर आली होती. याशिवाय या सिनेमासाठी सुशांतलाही अप्रोच करण्यात आलं होतं. परंतु यातही तो काम करू शकला नाही.