‘त्या’ मारहाण प्रकरणी अभिनेता विद्युत जामवालबाबत कोर्टाने दिला १२ वर्षांनी ‘हा’ महत्त्वाचा निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका बिजनेसमॅनला मारहाण केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता आणि जंगली फेम विद्युत जामवालबाबत वांद्रे सत्र न्यायालयाने निर्णय देत विद्युतला दिलासा दिला आहे. या मारहाण प्रकरणी विद्युत जामवाल आणि त्याचा मित्र हरिशनाथ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याबाबत कोर्टाने तब्ब्ल १२ वर्षांनी निर्णय दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २००७ मधील हे प्रकरण आहे.

पुराव्यांअभावी विद्युतची निर्दोष मुक्तता

जुहूमधील एका बिजनेसमॅनच्या डोक्यात काचेची बाटली फोडली असा आरोप विद्युत जामवालवर करण्यात आला होता. परंतु या तपासादरम्यान या घटनेशी संबंधित एकही साक्षीदार पोलिसांना भेटला नाही. या घटनेत विद्युत विरोधात पुराव्यांअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ज्या बिजनेसमनला माहराण केल्याचा आरोप करण्यात आला होता त्याचं नाव राहुल सुरी आहे.


नेमका प्रकार काय ?

ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये मध्यरात्री विद्युत जामवाल त्याच्या काही मित्रांसोबत पार्टी करत होता. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीची ही घटना आहे. पार्टी संपल्यानंतर सर्वजण जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी राहुल सुरी या जुहूमधील बिजनेसमनने विद्युतच्या मित्राला ढकललं यानंतर वादाला सुरुवात होऊन वाद वाढला. यानंतर संतापलेल्या विद्युत आणि त्याचा मित्र हरिशनाथ गोस्वामी यांनी राहुल सुरीला मारहाण केली असा विद्युत आणि त्याच्या मित्रावर आरोप करण्यात आला होता.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मार्च महिन्यातच विद्युत जामवालचा जंगली सिनेमा रिलीज झाला होता. सध्या विद्युत आगामी सिनेमा कमांडो ३ मध्ये व्यस्त आहे. ६ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. कमांडो ३ मध्ये अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैवेया यांचीही प्रमुख भूमिका असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त  (www.arogyanama.com) 

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

आहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like