‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला करायचंय सलमानशी लग्न, सर्वांसमोर इच्छा ‘प्रकट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सलमान खान नेहमीच आपल्या लग्नामुळे चर्चेत असतो. आताही सलमानच्या लग्नाबाबत चर्चा सुरु झाला आहे आणि त्याला कारण ठरलीय अभिनेत्री झरीन खान. झरीनने सलमानसोबत ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूमध्ये पदापर्ण केले. झरीनने एका मुलाखतीत सलमानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये सलमानच्या लग्नाचे वारे वाहू लागले आहे.

या मुलाखतीमध्ये झरीनला अनेक खुसखुशीत प्रश्न विचारण्यात आले. त्यातला एक प्रश्न कलाकारांच्या आयुष्यातील अफवांबद्दल होता. झरीनला थेट विचारण्यात आलं “तुला स्वत:बद्दल कोणतीही अफवा पसरवण्यास आवडेल? त्यावर उत्तर देताना झरीन म्हणाली की, सलमान खान माझ्याशी लग्न करणार असल्याची अफवा पसरवण्यास मला आवडेल.”

याशिवाय या मुलाखतीत तिला तू सलमान खान, गौतम रोडे आणि करण सिंह ग्रोवर यातील कोणाशी लग्न किंवा डेटवर जाण्यास तू इच्छुक आहे ? असेही विचारण्यात आले. त्यावर उत्तर देतानाही झरीनने सलमानचे नाव घेतले. मी सलमानसोबत डेटवर जाण्यास इच्छुक असल्याचे तिने सांगितले.

सलमान खाननेच झरीनला बॉलिवूडमध्ये पदार्पणात मदत केली होती. त्यावेळी त्यांच्या अफेअर बाबत जोरदार चर्चाही सिनेसृष्टीत सुरु होती. आता मात्र झरीन खानने सलमानचे नाव घेतल्यामुळे इंडस्ट्रीत पुन्हा सलमानच्या लग्नाचे वारे वाहू लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त