KRK बनवणार सुशांत सिंह राजपूतचं बायोपिक, ‘या’ 5 बड्या कलाकारांच्या जीवनावर यापूर्वीच आलेत सिनेमे !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कथित फिल्म क्रिटीक केआरके यानं अलीकडेच अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बायोपिकवरील सिनेमा प्रोड्युस करण्याची घोषणा केली आहे. बॉलिवूडमध्ये आजवर अनेक बायोपिक बनले आहेत. सुशांतच्या आधी बनलेले ते बायोपिक कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात.

1) जयललिता – यशस्वी अ‍ॅक्ट्रेस आणि तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या आयुष्यावर वेब सीरिज आणि सिनेमाही तयार झाला आहे. थलायवी असं या सिनेमाचं नाव आहे. सिनेमावर सध्या काम सुरू आहे. बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. लवकरच सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाण्याची आशा आहे.

2) संजय दत्त – राजकुमार हिरानी डायरेक्टेड आणि रणबीर कपूर स्टारर संजू हा सिनेमा संजय दत्तचं बायोपिक आहे. संजयचं ग्लॅमर, अंडरवर्ल्ड कनेक्शन्स, जेल, ड्रग्स आणि त्याच्या आयुष्यातील अनेक चढउतार यात पहायला मिळत आहेत.

3) सावित्री – साऊथमधील लेडी सुपरस्टार सावित्री यांच्या आयुष्यावरील बायोपिक 2018 मध्ये रिलीज झालं आहे. महानति असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात कीर्ति सुरेश आणि दुलकर सलमान यांनी लिड रोल केला होता.

4) सिल्क स्मिता – मिलन लुथरिया डायरेक्टेड आणि विद्या बालन स्टारर डर्टी पिक्चर हा सिनेमा साऊथची चर्चित अदाकारा सिल्क स्मिता यांच्या आुयष्यावर आधारीत आहे. साईड आर्टीस्ट ते सर्वात डिमांडिंग अ‍ॅक्ट्रेस असा सिल्कचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

5) हंसा वाडकर – अभिनेत्री हंसा वाडकर यांचंही बायोपिक रिलीज झालं आहे. 1977 साली आलेल्या या सिनेमाचं नाव आहे भूमिका. श्याम बेनेगल डायरेक्टेड या सिनेमात स्मिता पाटील आणि अमोल पालेकर प्रमुख भूमिकेत होते.