जाणून घ्या… तुमचे लाडके बॉलिवूड स्टार्स कितवी शिकलेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांच्याकडे कमी शिक्षण घेतल्याची डिग्री आहे. परंतु आज ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. परंतु तु्म्हाला वाचून विश्वास बसणार नाही त्यांचं शिक्षण खूपच कमी आहे. या यादीत सलमान खानपासून सुशांत सिंह राजपूतपर्यंत नावे आहेत. तर अभिनेत्रींमध्ये कंगना रणौतपासून दीपिका पादुकोणपर्यंतची नावे आहेत.

सलमान खान- सलमान खानने सिंधिया स्कूल ग्वालियर आणि सेंट स्टीन्सलॉ स्कूल, मंबईमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर नॅशनल कॉलेज, मुंबई मध्ये सलमान खानने प्रवेश घेतला खरा परंतु कॉलेजला मात्र जाऊ शकला नाही. म्हणजे सलमान खानने केवळ 12 वी पास आहे.

 

सुशांत सिंह राजपूत- सुशांत सिंह राजपूतचं सुरुवातीचं शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल, पटना येथे झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला आला. दिल्लीत त्याने कुलाची हंसराज मॉडेल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर त्याने दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधून मेकॅनिकल इंजिनियरींग पूर्ण केलं.

https://www.instagram.com/p/BwtXyWBF4sk/?utm_source=ig_embed

 

दीपिका पादुकोण- दीपिका पादुकोणने बंगळुरु मधील सोफिया हायस्कूल मधून 12 पर्यंत शिक्षण घेतलं. यानंतर तिने माउंट कारमेल कॉलेज बंगळुरु मध्ये प्रवेश घेतला. यानंतर मात्र मॉडेलिंगमुळे तिने शिक्षण अर्ध्यात सोडलं. यानंतर तिचे हे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. सध्या मात्र दीपिका बॉलिवूडमधील सर्वात महागडी हिरोईन आहे.

https://www.instagram.com/p/BvOVGmOA8_c/?utm_source=ig_embed

 

अक्षय कुमार- बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने देखील खास काही शिक्षण घेतले नाही. अक्षयने डॉन बॉस्को स्कूल मधून शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्लीतील खालसा कॉलेज मधून त्याने ग्रॅज्युएशन करत डिग्री घेतली. यानंतर अक्षय कुमार मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉकला गेला.

 

कंगना रणौत- अभिनेत्री कंगना रणौत 12 वीला नापास झाली होती. यानंतर तिने पुढे जाण्याचा विचारही सोडला. कंगना मॉडेलिंगसाठी दिल्ली आणि मग नंतर मुंबईला गेली. कंगनाने अनेकदा हे सांगितले आहे की, सुरुवातीला इंग्रजीमुळे तिची टर उडवली जायची.

 

अमीषा पटेल- अमीषा पटेलने कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल मधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर ती टफ्ट्स विश्वविद्यालयामध्ये अर्थशास्त्रचे शिक्षण घेण्यासाठी मॅसाचुसेट्सला गेली. तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की, अमीषा अर्थशास्त्रात गोल्ड मेडलिस्ट आहे. याशिवाय तिने बायोजेनेटिक इंजिनियरींग मध्येही डिग्री घेतली आहे.

 

राखी सावंत- सिनेमांमध्ये आपल्या आयटम डान्समुळे सर्वांचे मन जिकंणाऱ्या राखी सावंतचे खरे नाव नीरू भेदा आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार, राखी सावंतने मुंबई उत्तर-पश्चिममधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी तिने शैक्षणिक पात्रता अशिक्षित असल्याचं तिने सांगितले होते.