Mumbai News : अभिनेत्रीचा पायलटवर लग्नाचं आमिष देत अत्याचार केल्याचा आरोप ! FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लहान पडद्यावरील एका अ‍ॅक्ट्रेस, मॉडेलनं एका पायलटवर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुंबई उपनगरातील ओशिवारा पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आली.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांच्या समोर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अ‍ॅक्ट्रेसनं सांगितलं की, गेल्या वर्षी (2020) तिची भेट मॅट्रीमोनियल साईटद्वारे पायलट असलेल्या आरोपी सोबत झाली. त्यानं तिला लग्नाचं वचनही दिलं. तक्रारीनुसार, मूळचा भोपाळचा असलेला आणि मुंबईत राहणारा पायलट कायमच महिलेशी फोनवर बोलायचा. सोशलवर देखील त्यांची चॅटींग होत होती. पोलिसांनी सांगितलं की, 10 दिवसांपूर्वी आरोपीनं पीडितेला कॉल केला आणि तिला भेटायची तसंच घर पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

तक्रारीचा हवाला देत अधिकाऱ्यानं सांगितलं की, अ‍ॅक्ट्रेस मुंबईत एकटीच रहाते. आरोपी पायलटला घरी बोलवण्यासाठी ती सहमत झाली होती. त्यांनी सांगितलं की, आरोपीनं पीडितेला तिच्या आईवडिलांना भेटण्याचा, लग्नासाठी बोलण्याचा विश्वास दिला. परंतु त्यानं दिलेला शब्द पाळला नाही. अधिकाऱ्यानं असंही सांगितलं की, आरोपीच्या वर्तनाला कंटाळून अ‍ॅक्ट्रेसनं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी असंही सांगितलं आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.