Bollywood Actress Ananya Panday | धक्कादायक ! स्तनांवरील अश्लील सल्ल्यांमुळे अभिनेत्री हादरली अन्…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bollywood Actress Ananya Panday | बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Panday) हिने एका मुलाखतीदरम्यान एक धक्कादायक खुलासा केला आहे. या अभिनेत्रीबाबत करण्यात आलेल्या अशाच विक्षीप्त कमेंट्सनी केवळ ती अभिनेत्रीच नव्हे, तर वाचक आणि प्रेक्षकही हादरुन गेले आहेत. आपल्या संघर्षावर विधान केल्यामुळे सातत्याने ट्रोल होणारी अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडे (Actor Chunky Pandey) याची मुलगी आहे.

 

अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Panday) एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाली की, “आपल्याला कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो असं तिनं सांगितलं आहे. कलाजगतामध्ये सुरुवातीच्या काळात आपल्याला सेक्सिजमचा सामना करावा लागल्याचा,” धक्कादायक खुलासा केला आहे. दरम्यान, लोकांनी तिच्या स्तनांवरही कमेंट केल्या होत्या.

 

अनन्या म्हणाली की, “लोकांनी माझा चेहरा, शरीर आणि स्तनांवरही कमेंट केल्या. मला बूब जॉब करण्याचा सल्ला दिला हे हादरवणारं होतं. मी जेव्हा कामाची सुरुवात केली, तेव्हा लोक हे सर्व बोलत होते. मला ते थेट नाही म्हणाले. पण, विनोदी अंदाजात ते जे काही म्हणाले ते नकळतच माझ्यापर्यंत आले. ते म्हणायचे जरा वाढव…. वजन वाढव. हे किती वाईट आहे. तुम्ही एखाद्याच्या शरीरावरून प्रतिक्रिया कशा देऊ शकता ?,” असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Web Title :- Bollywood Actress Ananya Panday | ananya panday faced casual sexism intial days asked to get boob job done

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा