बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री ‘अनिता सिन्हा’ कालवश

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईन

बॉलीवूडच्या जेष्ठ अभिनेत्री अनिता सिन्हा यांचे निधन झाल्याची वृत्त आहे. आज (गुरुवारी)  मुंबईतील सिद्धार्थ नगर येथील एका इस्पितळात त्यांनी अंतिम श्वास घेतला. अनिता यांनी १९७४ चा हिंदी चित्रपट “रोटी” मध्ये छोटीशी भूमिका केली होती. या चित्रपटात राजेश खन्ना आणि मुमताज मुख्य भूमिकेत होते. अनिता यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

दत्तक मुलगा करणार अंतिम संस्कार

अभिनेत्री अनिता यांचे वडील लखनऊचे रहिवासी होते. प्रसिद्ध गायक किशोर कुमार याचे ते निकटवर्ती होते. अनिता यांनी लग्न केले नव्हते. त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले होते. आणि तोच मुलगा त्यांचे अंतिम संस्कार करणार असल्याची माहिती आहे.

अनिता सिन्हा मुबई यथील गोरेगाव या भागात राहत होत्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी पाजारी राहणाऱ्या व्यक्तींसोबत त्यांचे चांगले संबंध होते. सर्व लोक त्यांना ‘माताजी ‘ म्हणून हाक मारायचे. त्यांचे आरोग्य एकदम फिट असल्याचे समजते आहे. अनिता यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात जुनिअर आर्टिस्ट म्हणून केली होती. काही चित्रपटांमध्ये दुसऱ्या अभिनेत्रीचा डबल रोल यांना मिळाला होता.