‘पती मला परपुरुषासोबत ‘रोमँस’ करताना नाही पाहू शकत’, भाग्यश्रीचा ‘गौप्यस्फोट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार भाग्यश्री हिनं सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून डेब्यू केला होता. 1989 मध्ये आलेल्या या पहिल्याच सिनेमातून तिनं लोकांच्या मनात घर केलं. हा सिनेमा आला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. या सिनेमाच्यावेळीच भाग्यश्री आणि हिमालय दसानी रिलेशनशिपमध्ये होते. भाग्यश्रीचं करिअर खूपच लहान होतं. परंतु 2017 साली दिलेल्या एका मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला आहे.

भाग्यश्रीचा 2017 मधील एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या तिनं सिनेमांपासूनृ दूर जाण्याचं कारण सांगितलं आहे. व्हिडीओ भाग्यश्री म्हणते, माझे पती मला घेऊन खूप पजेसिव आहेत. ते मला स्क्रीनवर परपुरुषासोबत रोमँस करताना नाही पाहू शकत.

हेच कारण होतं की, भाग्यश्रीनं नंतर सिनेमांऐवजी कुटुंबावर फोकस करायला सुरुवात केली. भाग्यश्रीनं सिनेमा सोडण्यामागील कारण तिचा पतीच हे तिच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

मैने प्यार किया या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आजही खूप लोकप्रिय आहे. या सिनेमानं आणि यातील गाण्यांनी रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड तोडले होते. रिलीज होऊन एवढी वर्षे उलटूनही सिनेमाबद्दल अनेक गोष्टी समोर येताना दिसत असतात. 29 डिसेंबर 1989 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं सलमान खानलाही एक वेगळी ओळख दिली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like