‘भाईजान’ सलमानची ‘हिरोईन’ भाग्यश्री दीड वर्ष पतीपासून वेगळी राहिली, 30 वर्षांनंतर केला ‘खळबळजनक’ खुलासा (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 1989 मध्ये आलेल्या पहिल्याच सिनेमातून लोकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्रीनं अलीकडेच पती आणि लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोालतोय ती आहे सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री. या सिनेमानं भाग्यश्री रातोरात स्टार झाली. यानंतर पुढील वर्षी म्हणजेच 1990 साली तिनं हिमालय दासानी सोबत लग्न केलं. आता लग्नानंतर 30 वर्षांनंतर तिनं पती आणि लग्नाबद्दल चकित करणारा खुलासा केला आहे.

हिमालय दासानी फिल्म इंडस्ट्रीतील फेमस फिल्म मेकर आणि प्रोड्युसर आहे. भाग्यश्रीनं सांगितलं की, त्यांचं नातं परफेक्ट नव्हतं. सध्या भाग्यश्रीचं एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आलं आहे. यात भाग्यश्री म्हणत आहे की, “होय, हिमालय माझं पहिलं प्रेम होते. मी त्यांच्यासोबत लग्न केलं. परंतु एक असा काळ आला जेव्हा आम्ही वेगळं झालो.”

भाग्यश्री पुढे म्हणते, “हा तो काळ होता जेव्हा आम्ही दीड वर्षांसाठी वेगळं झालो होतो. जर मला ते भेटले नसते आणि मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं असतं तर काय झालं असतं. मला आजही ते दिवस आठवतात. मला ते आठवलं की, भीतीही वाटते.” भाग्यश्रीचा हा व्हिडीओ पाहून सारेच अवाक् झाले आहेत यात शंका नाही. लग्नाच्या 30 वर्षांनंतर तिनं या सगळ्यार खुलून भाष्य केलं आहे.