‘फिटनेस क्‍वीन’ दिशा, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची ‘डिनर डेट’ ; नेटकर्‍यांनी कॉमेंटस् करत केलं ‘हैराण’, ‘परेशान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या चर्चेत आले आहेत. दोघांनाही पुन्हा एकदा एका हॉटेलबाहेर एकत्र पाहिले आहे. सध्या या दोघांच्या मैत्रीची चर्चा रंगताना दिसत आहे. त्यांना एकत्र स्पॉट करण्याची ही तशी पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना एकत्र पाहिले आहे. याआधीही त्यांची प्रचंड चर्चा झाली होती.

सध्या दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेरचा हा फोटो आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, आदित्य ठाकरेंसोबतच्या या फोटोमुळे दिशा ट्रोल होतानाही दिसत आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट करत दिशाची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे.

image.png

दिशा आणि आदित्य यांच्या फोटोवर एका युजरने लिहिले आहे की, ‘अब फिर एक बार टायगर के पैर में चोट लगने वाली है.’ तर एका युजरने प्रश्न विचारला आहे की, ‘टायगर कहा है ?’ याउलट दिशाच्या या फोटोवर एकजण म्हणतो की, ‘टायगर जिंदा है.’ दिशाची खिल्ली उडवत तिला ट्रोल करताना एका युजरने असेही म्हटले आहे की, ‘अब टायगर का क्या होगा’ अशा प्रकारे वेगवेगळ्या कमेंट करत युजर्सने दिशाला ट्रोल केले आहे.

एम एस धोनी सिनेमाने दिशाला विशेष प्रसिद्धी मिळाली. दिशा आपल्या हॉट  आणि परफेक्ट फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा सोशलवर नेहमीच तिचे हॉट फोटो शेअर करत चर्चेत येत असते. टायगर श्रॉफसोबत रिलेशनमुळेही दिशा अनेकदा चर्चेत आली आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरमुळे  दिशा पु्न्हा चर्चेत आली आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भारत या सिनेमात ती सलमान खान सोबत दिसली आहे. हा सिनेमा शानदार कमाई करताना दिसत आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती