अभिनेत्री हुमा कुरेशी ‘या’ दिग्दर्शकाला करतेय ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना कलाकारांच्या सर्व गोष्टी कळत असतातच. उदा. त्यांच्या चित्रपटांविषयी, खाजगी आयुष्याविषयी. अनेकदा कलाकारांच्या खाजगी गोष्टी कलाकार गुलदस्त्यात ठेवत असतात. अशीच काहीशी गोष्ट अभिनेत्री हुमा कुरेशी हीच्या बाबतीत झाली आहे. या अभिनेत्रीची एक खास गोष्ट चाहत्यांसमोर आली आहे.

https://www.instagram.com/p/B2AAWtWDZaP/?utm_source=ig_embed
सोशल मीडियावर नुकतेच हुमाने एक फोटो शेअर करुन तिच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीची भेट चाहत्यांशी केली आहे. या अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक मुदस्सर अजीज. हुमा आणि ‘पती पत्नी और वो’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सध्या जोरदार चालू आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमधून या गोष्टींचा उलगडा झालेला आहे.

अभिनेत्री हुमाने मुदस्सरला दिलेल्या शुभेच्छामुळे दोघांच्या नात्याचा अंदाज लावला जात आहे. हुमा म्हणाली की, ‘आतापर्यंत तू केलेल्या कामावर मला गर्व आहे. तुझे सर्व स्पप्न पुर्ण होवो’. अभिनेत्री हुमा सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी खूप व्यस्त आहे. मुदस्सर हा १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला बीआर चोप्रा यांच्या एका चित्रपटांवर काम करण्याला खूप प्राधान्य देत आहे. ‘पती पत्नी और वो’ असं त्याच्या या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन, अभिनेत्री भूमी पेडणेकर, अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like