वाराणसीत चेहरा ‘लपवून’ फिरताना दिसली जान्हवी कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या वाराणसीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. दोस्ताना 2 या तिच्या आगामी सिनेमाचं पहिलं शेड्युल पूर्ण झालं आहे. यानंतर जान्हवीनं वाराणसीतल्या गल्ली-बोळात फिरण्याचा आनंद घेतला. जान्हवीनं या वेळचे काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

खास बात अशी की, अनेक ठिकाणी फिरताना जान्हवी आपला चेहरा लपवून फिरत होती. यावेळी जान्हवीनं गंगा आरतीचाही आनंद घेतला. यावेळी तिच्यासोबत तिचे काही मित्रही होते. यानंतर तिनं वाराणसीच्या गल्ली बोळातून फिरण्याचा आनंद घेतला. काही ठिकाणी ती रिक्षातून जाताना दिसली.

गल्ली बोळातील अनेक खाद्यपदार्थांचाही जान्हवीनं आनंद घेतला. बाजारात फिरताना मात्र जान्हवीनं आपला चेहरा लपवला होता. यावेळचे तिचा काही फोटो समोर आले आहेत जे चाहत्यांनाही खूप आवडले आहेत.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर दोस्ताना 2 या सिनेमाच्या शुटींगमध्ये ती सध्या व्यस्त आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसणार आहे. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाच्या बायोपिक असेलल्या सिनेमात आणि घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/