काजल अग्रवालनं शेअर केले हनिमूनचे थ्रोबॅक फोटो ! बिकिनी घालून फ्लोटिंग ब्रेकफास्ट करताना दिसली अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अ‍ॅक्ट्रेस काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) हिनं 30 ऑक्टोबर रोजी उद्योगपती गौतम किचलू (Gautam Kitchlu) सोबत लग्न केलं. लग्नाला 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर काजलनं हनिमूनसाठी पतीसोबत मालदीव गाठलं होतं. काही दिवसांपूर्वीच काजल मालदीवमध्ये हनिमून एन्जॉय करून परतली आहे. काजलनं हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. हनिमूनवरून परत आल्यानंतरही ती व्हॅकेशन मुडमध्ये दिसत आहे. कारण हनिमूनच्या काही फोटोंमुळं ती पुन्हा चर्चेत आली आहे.

काजलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात काल बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये फ्लोटिंग ब्रेकफास्टचा आनंद घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये काजल म्हणते, मूड.

सध्या काजलचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

याआधीही तिनं काही फोटो शेअर केले होते, ज्यात ती हनिमूनचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांची बेडरूम अंडरवॉटर होती. फोटोत ती याच रूममध्ये दिसली होती. पाण्याच्या आत बनवलेली ही रूम दिसायला खूप सुंदर दिसत होती. काजलच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती फोटोत ब्लू ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोत काजल आणि गौतम यांचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळाला.

काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या लवकरच ती इंडियन 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती सुपरस्टार कमल हासन सोबत दिसणार आहे. एस शंकर हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. तिच्याकडे साऊथचे दोन सिनेमे आहेत. याशिवाय काजल मुंबई सागा या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.