‘त्या’ चित्रपटावेळी झाला होता ‘गर्भपात’, काजोलनं केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने एका मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक घटनांचा उलगडा केला आहे. यावेळी तिने तिची आणि अजय देवगणची पहिली भेट त्याचबरोबर त्यांच प्रेमात झालेलं रुपांतर आणि लग्नासंबंधित काही गोष्टी सांगितल्या. यावेळी तिने आपला दोनवेळा गर्भपात झाल्याचा खुलासा करत आपल्या आयुष्यातील त्या खडतर प्रवासांबद्दल गोष्टी शेअर केल्या.

काजोलने मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘2001 मध्ये ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान मी गर्भवती होते. पण माझा गर्भपात झाला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत होता तेव्हा मी रुग्णालयात होते. माझ्यासाठी ती आनंदाची वेळ नव्हती. त्यानंतर माझा अजून एक गर्भपात झाला. माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होता.’

काजोलने अजय देवगणसोबतच्या पहिल्या भेटीची आठवण शेअर करत म्हणाली की, ‘ 25 वर्षांपूर्वी ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर आमची पहिली भेट झाली. मी शूटसाठी तयार झाले होते आणि मी विचारले की माझा हिरो कुठे आहे? कोणीतरी अजयकडे बोट दाखविले. तो एका कोपऱ्यात शांत बसला होता. त्याला भेटण्याच्या 10 मिनिटे आधी मी त्याच्याबद्दल गॉसिप करत होते. सेटवर आम्ही बोलू लागलो आणि लगेच आमच्यात मैत्री झाली.’

काजोल पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी आम्ही दोघेही वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करत होतो. मी अजयकडे माझ्या प्रियकराची तक्रार देखील केली होती. पण लवकरच आमच्या दोघांचाही ब्रेकअप झाला. आमच्या दोघांपैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केला नाही, पण आपण एकत्र आहोत हे दोघांनाही माहित होते. हात पकडण्यापासून सुरु झालेले नाते आम्हाला कळण्याआधीच फार पुढे गेले होते.’

https://www.instagram.com/p/B6HrUdTJ0zV/

अजय देवगणचा ‘तान्हाजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून यामध्ये अजय देवगण छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर मावळे तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटामध्ये काजोल आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिका साकारत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/