US मधील जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूचा निषेध करणारे महाराष्ट्रातील साधूंच्या हत्यनंतर गप्प का होते ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत 46 वर्षीय कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तिथे अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरु असून हिंसाचार सुरु आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरण पेटले आहे. हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडचेही अनेक सेलिब्रेटी या घटनेचा निषेध करत आहे. बॉलिवूडची बिनधास्त गर्ल कंगनाने यावर नाराजी व्यक्त केली असून संबंधित मोहिमेला पाठिंबा देणार्‍यांना खडे बोल सुनावले आहेत.

कंगनाची अमेरिकेतील घटनेवर थोडी वेगळी प्रतिक्रिया आहे. पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येचा भारताशी संबंध जोडायचा असेल तर मग महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली होती. त्यावेळी बॉलिवूडच्या एकाही सेलिब्रेटीने मत व्यक्त केले नव्हते. हे तिथेच झाले आहे जिथे सेलिब्रेटींची संख्या जास्त आहे.

बॉलिवूडचे सेलिब्रेटी काही वेळासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी हॉलिवूडची नक्कल करतात हे लज्जास्पद आहे. भारतातल्या लोकांमध्ये गुलामगिरीची सवय अजूनही आहे आणि तेच इंग्रज मोहीम चालवतात. त्यानंतर अनेकजण असेच त्यांच्या पावलावर पाऊल टाकतात.

र्यावरणासारख्या मुद्द्यावर भारतातील अनेक लोक काम करत असून काहींना पद्मश्रीदेखील मिळालं आहे. पण बॉलिवूडचे लोक त्यांचं समर्थन करण्याऐवजी एका परदेशी मुलीचे समर्थन करतात. कारण त्यांना वाटते समर्थन देण्यासाठी साधू किंवा आदिवासी इतके आकर्षक नाहीत, असेही कंगनाने म्हटले आहे. भारतीय मुद्द्यांवर शांतता बाळगणार्‍या बॉलिवूड सेलिब्रेटींना कंगनाने सुनावले आहे.