माझं घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडं लक्ष दिलं असतं तर… , कंगनाचा पुन्हा एकदा CM ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. आता भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनानं पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. बेकायदेशीररित्या माझं घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिलं असतं तर आज 50 जणांचा जीव वाचला असता असं कंनगा म्हणाली आहे. यासंदर्भात तिनं ट्विट केलं आहे.

कंगना म्हणते, उद्धव ठाकरे, संजय राऊत, मुंबई महानगरपालिका ज्यावेळी माझं घर बेकायदेशीररित्या पाडत होते त्यावेळी या इमारकतीकडं लक्ष दिलं असतं तर आज हे जवळपास 50 लोक जिवंत असले असते. एवढे जवान तर पुलवामा पाकिस्तानमध्ये मारले नाहीत जेवढे तुमच्या निष्काळजीपणामुळं मरण पावले आहेत. मुंबईचं काय होईल हे देवालाच ठाऊक.

गेल्या काही दिवसांपासून कंगना सतत सीएम ठाकरे आणि राऊतांवर टीका करत आहेत. तिचं ऑफिस पाडल्यानं ती खूप भडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे.

भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 41 जणांचा बळी गेला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पहिल्या दिवशी 14, दुसऱ्या दिवशी 12 तर तिसऱ्या दिवसी सर्वाधिक 15 मृतदेह हाती लागले आहेत. 60 तास उलटूनही इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम बचाव पथकाकडून सुरूच आहे.