कंगनाच्या ‘ट्वीटमधून महात्मा गांधींसह नेहरूंवर निशाणा : राजकीय वाद वाढण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ( Bollywood) अभिनेत्री कंगना ( kangana) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्याचबरोबर नेहमी वादग्रस्त ट्विट ( Tweet) करत असते. आता तिने नवीन ट्विट करत वादग्रस्त विधान केले आहे. ट्वीट करून थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Mahatma Gandhi) आणि पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्यावर निशाणा साधला आहे.कंगनाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कंगनानं ट्वीट करून त्यांना अभिवादन केलं. मात्र, कंगनाचं हे ट्वीट आता सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल होत आहे. कारण कंगनानं सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती निमित्ताने शुभेच्छा, भारताचे लोहपुरुष सरदार पटेल तुम्ही अशी व्यक्ती होतात, ज्यांनी आम्हाला आजचा अखंड भारत दिला. महात्मा गांधी यांनी खूश करण्यासाठी आपण पंतप्रधान पदाचा त्याग केला. महात्मा गांधी यांना असं वाटत होतं की, नेहरू हे उत्कृष्ट इंग्रजी बोलतात. त्यामुळे महात्मा गांधीच्या निर्णयामुळे केवळ सरदार पटेल यांनाच नाही तर संपूर्ण देशाला अनेक दशकांपर्यत नुकसान सहन करावं लागलं. आपण आपले महान नेतृत्त्व आणि दृष्टी आमच्यापासून दूर नेली. आपल्या निर्णयाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्यामुळे तिच्या ट्विटमुळे नसून वाद निर्माण होऊ शकतो. कंगनाच्या या ट्विटवर काँग्रेसनं ( Congress) कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून काँग्रेस या आरोपांवर काय प्रतिक्रिया देते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांनी गुजरातमधील केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ यूनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मोदींनी पुलवामा हल्ला प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराजी व्यक्त विरोधकांना चांगलेच फटकारलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की,आपण सर्वांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, देशाची सुरक्षाही सर्वोच्च स्थानावर आहे. जेव्हा आपण आपल्या राष्ट्राच्या हिताबद्दल विचार करू, तेव्हा आपली प्रगती होईल. आपल्या राष्ट्राची सुरक्षा करणाऱ्या जवानांचे मनोधैर्य खचू नये, असे कोणतेही विधान राजकीय पक्षांनी करू नये. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या कृत्यांमुळे देशविरोधी शक्तींना ताकद मिळेल, यामुळे देशासह तुमच्या पक्षाचेही यात नुकसान आहे’ असा टोलादेखील त्यांनी काँग्रेसला मारला. त्याचबरोबर देशावर संकट असताना राजकीय चिखलफेक करण्यात काही लोकं व्यस्त होती असे म्हणत काँग्रेसवर टीका केली.