मोदींची फॅन कंगना केवळ ‘या’ अटीवर उतरणार राजकारणात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात सर्वत्र सध्या इलेक्शन फिवर आहे. मग बॉलिवूड कसे यात मागे राहील ? बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत ने देखील एका कार्यक्रमादरम्यान राजकारणाविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. यापूर्वी देखील कंगना रनौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन असल्याचे समोर आले होते.

एका कार्यक्रमादरम्यान राजकारणाबद्दल कंगनाला प्रश्न विचारला असता राजकरणाविषयी तिने आपले मत व्यक्त केले. कंगनाने सांगितले की, मला वाटतं की राजकारण एक चांगलं क्षेत्र आहे. पण त्याला चुकीचं समजलं जातं. मला अनेक नेत्यांचा फॅशन सेन्स आवडत नाही. जर ते माझा फॅशन सेन्स बदलणार नसतील तरच मला राजकारणात उतरायला काही अडचण येणार नाही असं कंगणाने सांगितले.

जो माझा देश आहे तिथेच मी

कंगनाने म्हटले की, नॅशनलिस्ट होण्यात आणि फंडामेंटलिस्ट होण्यात फरक असतो. माझा धर्मावर विश्वास नाही, जो माझा देश आहे तिथेच मी आहे. आपल्या देशाबद्दल लाज का वाटावी ? जर अमेरिका त्यांच्या राष्ट्रगीतासाठी एकत्र उभा राहत असेल तर आम्ही का नाही होऊ शकत ? देशाबद्दलचं वाईट बोलणं अनेकजण सहज घेतात. तरुण पिढी सातत्याने तक्रार करते. देश घाण असेल तर तुम्ही पाहुणे आहात का ? साफ करा असंही कंगनाने सांगितले.

मोदी एक यशोगाथा

पंतप्रधान मोदींची चाहती असल्याचेही कंगनाने यावेळी सांगितले. मोदींचे कौतुक करताना कंगना म्हणाली की, मी मोदींची मोठी चाहती आहे. जास्त पेपर वाचत नाही पण मोदी एक यशोगाथा आहेत. एका सर्वसामान्य व्यक्तीची महत्त्वकांक्षा, एक चहावाला देशाचा पंतप्रधान आहे. हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग परिपूर्ण असू शकत नाही पण आपण त्याच्या जवळपास पोहचण्याचा प्रयत्न करु शकतो असही ती म्हणाली.