सामान हरवलं म्हणून एअर इंडियावर भडकली अभिनेत्री कृती खरबंदा, एअरलाइन्सनं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदाने ट्विट करून एयर इंडियाला त्यांच्या निष्काळजीपणाची आठवण करून दिली आहे. कृती ने ट्विट केले होते की, प्रिय एयर इंडिया माझे सामान हरवल्याबद्दल धन्यवाद, कदाचित तुम्हाला तुमच्या स्टाफला काही प्राथमिक गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. कृती च्या ट्विट ला रिप्लाय देताना एयर इंडिया ने उत्तर दिले की, कृतीचे हरवलेले सामान डिलिव्हरीसाठी परत पाठविले आहे.

एयर इंडियाने म्हटले आले की, आम्ही झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कृपया आम्हाला तुमच्या सामानाचा टॅग नंबर आणि रेफेरन्स नंबर द्या आणि सोबतच तुमचे प्रवासाचे डिटेल्स सुद्धा द्या, म्हणजे तुमचे सामान सांभाळणाऱ्या टीमकडे आम्हाला चौकशी करता येईल.

यावर कृती म्हणते, मी तुमची माफी मान्य करते. पण तुमच्या गोवा आणि मुंबई विमानतळावरील टीमला एवढी सुद्धा सभ्यता नाहीये, ती टीम माझ्या सामानाबद्दलचे काही अपडेट्स देऊ शकेल. यावर एअर इंडिया म्हणाले, कृती खरबंदा तुमचे सामना मुंबई विमानतळावरून गोवा विमानतळावर साडे अकराच्या दरम्यान पोहोचत आहे. कृपया सामान तुमच्यापर्यँत पोहचवण्यासाठी तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि फ्लाईट डिटेल्स आम्हाला द्या, ज्यावरून आम्ही तुम्हाला चांगली सुविधा देऊ शकू.

कृती आणि एयर इंडियातील हा वाद काही पहिलाच नसून, २०१४ मध्ये सुद्धा केम्पेगौडा विमानतळावर मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यामुळे एयर इंडियाच्या लोकांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. या बद्दल सुद्धा कृती ने एक पोस्ट शेअर केली होती.

You might also like