लग्नाच्या चर्चांवर कृती खरबंदानं सोडलं मौन ! पुलकित सम्राटला करतेय डेट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा (Kriti Kharbanda) आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. एका वर्षापासून जास्त काळ झाला आहे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबद्दलही बरंच बोललं जात होतं. लवकरच दोघं लग्न करणार आहेत अशीही चर्चा सुरू होती. लॉकडाउनमुळं हे लग्न टाळलं असंही बोललं गेलं. आता लग्नाच्या चर्चांवर खुद्द कृतीनंच भाष्य केलं आहे.

‘मी खूप भाग्यवान आहे की…’

कृतीनं एका मुलाखतीत बोलताना त्यांच्या व्हॅकेशनबद्दलही भाष्य केलं. कृती म्हणाली, ट्रीपमध्ये आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी संधी दिली. मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या आयुष्यात पुलकितसारखा माणूस आहे, ज्याची कायम माझ्या चेहऱ्यावर हसू पाहण्याची इच्छा असते. मीही त्याच्यासाठी असंच काहीसं करण्याचा प्रयत्न करत असते.

लग्नाबद्दल बोलताना कृती म्हणाली…

लग्नाबद्दल बोलताना कृती म्हणाली, आम्ही फक्त दीड वर्षापासून एकमेकांना डेट करत आहोत. आम्ही अद्याप लग्नाबद्दल चर्चा केलेली नाही. आता तरी आमचा तसा काही प्लॅन नाही. आता आम्ही आमच्या करिअरवर फोकस करत आहोत. लग्न आता दूरचं स्वप्न आहे असंही ती म्हणाली.

कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लास्ट टाईम ती मल्टी स्टारर सिनेमा पागलपंतीमध्ये दिसली होती. या सिनेमात जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूज, अनिल कपूर, अरशद वारसी असे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

 

You might also like