मलायका आणि अर्जुन पुन्हा एकदा एकत्र हॉस्पीटलला जात असल्याचं दिसल्यानं ‘खळबळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर. या दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अलीकडेच मलायका आणि अर्जुन यांची जोडी एका क्लिनिकच्या बाहेर एकत्र दिसली. हे दोघे क्लिनिकमधून बाहेर पडताच लगेचच कारमध्ये बसून निघून गेले. हे दोघे क्लिनिकच्या बाहेर एकत्र दिसल्यामुळे चाहते चिंतेत पडले आहे. नेमके कोणाच्या उपचारासाठी हे क्लिनिकमध्ये गेले असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

मलायकाने यावेळी व्हाईट कलरचा टॉप आणि हॉट पॅन्ट घातली होती. या लूकमध्ये मलायका खूपच हॉट दिसत होती. या कॅज्युअल लूकमध्ये मलायकाने तिच्या डोळ्यावर हेअर बन आणि गॉगल घातला होता. त्याचबरोबर अर्जुन कपूरसुद्धा लोअर टी-शर्ट परिधान करून खूपच कॅज्युअल दिसला. मात्र, हे दोघेही कोणत्या कारणामुळे क्लिनिकमध्ये पोहोचले हे अद्याप कळू शकले नाही.

अलिकडेच मलायकाच्या 46 व्या वाढदिवशी अर्जुन कपूर पार्टी करताना दिसला. त्याचबरोबर अर्जुनने मलायकाला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. बर्‍याचदा ही जोडी एकत्र फिरताना आणि एन्जॉय करताना दिसून येते. अर्जुन आणि मलायका त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे देखील चर्चेत असतात.

Visit : Policenama.com