भारताविरोधातील नेपाळच्या निर्णयाचं अभिनेत्री मनीषा कोईरालानं केलं समर्थन, म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार मनीषा कोईराला हिनं नेपाळ सरकारनं जारी केलेल्या नवीन नकाशाचं खुलेआम समर्थन केलं आहे. नेपाळच्या संसदेनं या महिन्यात नवीन नकाशा प्रसिद्ध केला आहे ज्यात भारताचे तीन भाग लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा समाविष्ट करण्या आले आहेत. नेपाळ या भूभागांवर त्यांचा हक्क असल्याचा दावा करत आहे.

मनीषा कोईराला हिनं सराकारच्या या पावलाचं समर्थन करत ट्विट केलं की, “क्षेत्रीय सार्वभौमत्व + राजकीय सार्वभौमत्व +आर्थिक सार्वभौमत्व = सार्वभौम देश.” मनीषाच्या या ट्विटनंतर एका युजरनं तिला विचारलं की, ती नेपाळच्या स्थितीवरून ट्विट करत आहे का. तेव्हा मनीषानं या गोष्टीची पुष्टी करत उत्तर दिलं होतं.

मनीषानं ट्विट केलं की, “मी फक्त विचार करत होते की, नेपाळ आज कुठं उभा आहे आणि भविष्यात या मोर्चांवर कोणत्या देशात पुढे जाईल. आम्हाला भूतकाळाचं माहित नाही. मी हे नाही म्हणत की हे चांगलं आहे. पण असंच विचार आला.”

यानंतर मनीषा कोईरालावर जोरदरा टीका झाली. यानंतर तिनं पुन्हा स्पष्टीकरण देत लिहिलं की, माझी अशी विनंती आहे की, प्लिज तुम्ही आक्रमक आणि आपत्तीजनक भाषेचा वापर करू नका. आपण या स्थितीत एकमेकांच्यासोबत आहोत. आपलं सरकार या मुद्द्याचं समाधान करेल. यादरम्यान आपण सभ्यपणे वागू शकतो. मी पूर्णपणे आशावादी आहे.

नेपाळी वंशाची मनीषा करोईराला हिनं नेपाळ सरकारनं घेतलेल्या भूमिकेचं याआधीही कौतुक केलं होतं. मनीषानं नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या त्या ट्विटचं समर्थन केलं होतं ज्यात त्यांनी कालापानी आणि लिपुलेख सारखा वादग्रस्त भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केला होता. मनीषा ट्विट करत म्हणाली की, आपल्या छोट्याशा देशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी धन्यवाद. मी सर्वच तीनही महान देशांमध्ये शांततापूर्ण आणि आदरयुक्त बातचित व्हावी अशी इच्छा व्यक्त करते.”