अनुराग कश्यप यांच्या अडचणी वाढल्या, अॅक्ट्रेस पायल घोषने केला लैंगिक शोषणाचा आरोप, PM मोदींकडे केली मदतीसाठी विनंती
मुंबई : बॉलीवुड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप सोशल मीडियाद्वारे पीएम नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने करत असलेल्या वादग्रस्त टिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनुराग कश्यपवर यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिने ट्विट करून लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याशिवाय पायलने या खुलाशानंतर आपल्या सुरक्षेला धोका असल्याचेही म्हटले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून न्यायासाठी पीएम नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.
पायल घोषने आपल्या ट्विटरवर पोस्ट शेयर करत लिहिले – अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली आणि खुप वाईट वर्तन केले. पायलने पीएम मोदी आणि पीमओच्या ट्विटर अकाऊंटवर टॅग करत पुढे लिहिले, कृपया याच्यावर अॅक्शन घ्या आणि देशाला दाखवून द्या, या क्रिएटिव्ह व्यक्तीच्या पाठीमागे लपलेला राक्षस. मला माहित आहे की हा मला त्रास देऊ शकतो आणि माझी सुरक्षा धोक्यात आहे. प्लीज मला मदत करा.
आपल्या या ट्विटसोबत तिने एका तेलगु न्यूज चॅनलची लिंक सुद्ध शेयर केली आहे. या चॅनलवर पायलचा एक व्हिडिओ दाखवला जात आहे. या व्हिडिओत पायल इंग्रजीत बोलत अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करताना दिसत आहे, तसेच वाईट वर्तन केल्याचे ती सांगत आहे. पायलने म्हटले, मला अशा गोष्टींमुळे अस्वस्थ वाटत आहे.
अॅक्ट्रेसच्या या ट्विटवर लोकांच्या ताबडतोब प्रतिक्रिया मिळत आहेत. प्रत्येकजण या प्रकरणाचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अॅक्ट्रेसचे ट्विट रिट्विट सुद्धा केले जात आहे. मात्र, अजूनपर्यंत या प्रकरणी फिल्ममेकर अनुराग कश्यपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.