‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या होत्या अनेक ‘सेक्स कॉमेडी’ सिनेमाच्या ऑफर्स, राधिका आपटेचा मोठा ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार राधिका आपटे सध्या आपल्या एका स्टेटमेंटमुळं चर्चेत आली आहे. यात तिनं सांगितलं आहे की, वरुण धवनच्या बदलापूर सिनेमात तिचे अनेक न्यूड सीन्स व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक अ‍ॅडल्ट सिनेमांच्या ऑफर यायला सुरू झाल्या होत्या. एका मुलाखतीत राधिकानं याबद्दल सांगितलं आहे. राधिका असंही म्हणाली की, न्यूड सीन्सनंतर लोक तिच्याबद्दल काही वेगळाच विचार करू लागले होते.

राधिकानं सांगितलं की, बदलापूर सिनेमात न्यूड सीन्स दिल्यानंतर मला अनेक सेक्स कॉमेडी सिनेमात काम करण्यासाठी ऑफर्स आल्या. परंतु मी या ऑफर्स कधीच स्विकारल्या नाही ज्यात मला फिल्ममेकर्सचा दृष्टीकोन आवडला नाही.

राधिका म्हणते, “तुम्ही काय दाखवता आणि ते कसं दाखवता याशिवाय तुमचा दृष्टीकोन काय आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी बदलापूरमध्ये बोल्ड सीन्स दिले. यानंतर अहिल्या या शॉर्ट फिल्ममध्येही असंच काम केलं. यानंतर माझी एकाच टाईपची इमेज आहे असे लोक सजमत होते. मला आलेल्या सर्व ऑफर्स मी माझ्या चांगल्या करिअरसाठी नाकारल्या.” राधिका असंही म्हणाली की, बी टाऊनमधील संगतीचा तिच्यावर खूप प्रभाव पडला.

राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एक सिनेमा डायरेक्ट करताना दिसणार आहे. तिनं स्लीपवॉकर्स नावाच्या एक शॉर्ट फिल्मचं डायरेक्शन केलं आहे. शुट द पियानो प्लेअर या सिनेमात ती लिडमध्ये दिसणार आहे. श्रीराम राघवन डायरेक्टेड हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय ती रात अकेली है या सिनेमातही काम करणआर आहे. हा सिनेम 2021 मध्ये रिलीज होणार आहे.