रिचा चड्ढाचा मोठा खुलासा ! ‘या’ अभिनेत्याशी करणार लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल जवळपास 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 74 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल दरम्यान या दोघांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली होती. तसेच रेड कार्पेटवर एकत्र चालत लोकांना आश्चर्यचकित केले होते. आता रिचा लग्नाविषयी खुलेपणाने बोलली आहे. आमच्या लग्नाचे प्लॅनिंग करायचे झाल्यास संपूर्ण प्रॉडक्शन टीम लागेल. अली आणि माझ्या प्रॉडक्शन टीमला यासाठी एकत्र यावे लागेल. कारण सध्या आम्ही प्रचंड बिझी आहोत.
Richa-Chadhdha-and-Ali-Faza
रिचाने पुढे स्पष्ट केले की, सध्या अलीला स्वत:ला महिन्यातील पाच दिवस कसेबसे मिळतात. आम्ही कमिटमेंटला घाबरतो असे नाही. पण खरोखर आम्ही खूप बिझी आहोत. इतके की, आम्हाला एकमेकांना भेटायलाही वेळ नाही. अनेकदा आम्ही महिन्यातून दोनदा भेटतो.

रिचाचा अलीवर कौतुकाचा वर्षाव
अली माझा खूप चांगला मित्र आहे. मी जिथे असते तिथे येऊन तो मला सरप्राईज देतो. आम्ही एकमेकांसोबत असतो तेव्हा एकत्र स्वयंपाक करतो, एकत्र सिनेमे पाहतो आणि कधीकधी वर्कआउटसाठी देखील सोबत जातो.

You might also like