श्रद्धा कपूरचा भाऊ अभिनेता सिद्धांतला ‘कोरोना’ची लागण ! म्हणाला- ‘टेस्ट सेंस गेला होता…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) चा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा मुलगा अ‍ॅक्टर सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) ला कोरोना (Covid-19) ची लागण झाली आहे. सध्या तो गोव्यात होता. तिथंच त्यानं कोरोना टेस्ट केली होती ज्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

अभिनेते शक्ती कपूर यांनी याआधीच सांगितलं होतं की, माझ्या मुलाला कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आता खुद्द सिद्धांतनंच कंफर्म केलं आहे की, त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

एका इंग्रजी वृ्त्तपत्रासोबत बोलताना सिद्धातनं सांगितलं की, रविवारच्या आसपास माझा टेस्ट सेन्स गेला होता. मला वाटलं की, मी टेस्ट करायला पाहिजे. मी गोव्यात आहे. इथं आमचं एक घर आहे. देवाची कृपा आहे की, मी मुंबईच्या गर्दीत किंवा ट्राफिकमध्ये नाहीये. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. मला वाटत की, काही दिवसांतच मी ठिक होईन.

सिद्धांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो भूत पार्ट वन : द हॉन्टेड शिप या सिनेमात शेवटचा दिसला होता. लवकरच तो बिग बी अमिताभ आणि इम्रान हाश्मी यांच्या सोबत चेहरे या सिनेमात काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा जुलै 2020 मध्ये रिलीज होणार होता. परंतु याची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली आहे.