श्रुती हासननं चोरली एकाची लुंगी ! Bold फोटो शेअर करत दिली माहिती, ‘त्या’ व्यक्तीनंही दिली प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) हिनं अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. सध्या ती साऊथच्या इंडस्ट्रीत जास्त सक्रिय असल्याचं दिसत आहे. श्रुती हासन (Shruti Haasan) सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असते. श्रुतीनं अनेकदा आपल्या हॉट अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामुळे ती अनेकदा सोशलवर चर्चेचा हिस्सा बनताना दिसली आहे. अलीकडेच श्रुतीनं काही ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर केले. खास बात अशी की श्रुतीनं बिकिनी घातली होती परंतु फोटोंपेक्षा तिनं दिलेल्या कॅप्शनचीच जास्त चर्चा होताना दिसली.

श्रुतीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्रुती बोल्ड अवतारात दिसत आहे. तिनं फ्लॉरल बिकिनी घातली आहे. पाण्यात उभी राहून पोज देणारी श्रुती खूपच हॉट दिसत आहे.

श्रुतीनं शेअर केलेल्या फोटोंपेक्षा तिनं दिलेल्या कॅप्शनचीच जास्त चर्चा होताना दिसत आहे. श्रुतीनं लिहिलं की, रंगांमध्ये रहात आहे. पीएस- मी तुझी लुंगी चोरली. श्रुतीनं Ryan Stephen या व्यक्तीला पोस्टमध्ये टॅग केलं आहे. त्यालाच ती त्याची लुंगी चोरल्याचं सांगत आहे.

खास बात अशी की या व्यक्तीनंही श्रुतीला कमेंट करत रिप्लाय दिला आहे. त्या व्यक्तीनं लिहिलं की, कृपया ही लुंगी ठेवून घे.

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती साऊथ सुपरस्टार धनुष सोबत थ्री या सिनेमात झळकली होती. श्रुती बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही सक्रिय आहे.