Birthday SPL : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पागल होती सोनाक्षी सिन्हा, वडिलांना मंजूर नव्हतं !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा आज आपला 33 वा वाढदिवस साजरा केला आहे. सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 रोजी मुंबईत झाला होता. आपलं फिल्मी करिअर सुरू करण्यासाठी तिला सलमानची खूप मदत झाली. आज आपण तिच्या लव लाईफबद्दल काही जाणून घेणार आहोत.

एका इंग्रजी वृत्तानुसार, सोनाक्षी सध्या बंटी सजदेह याला डेट करत आहे. परंतु याआधी तिचं नाव बॉलवूडचा फेमस अ‍ॅक्टर रणवीरसोबतही जोडलं गेलं आहे. परंतु ही लव स्टोरी अधुरीच राहिली. 2013 साली आलेला सोनाक्षी आणि रणवीर सिंग यांच्या लुटेरा या सिनेमानंतर सोनाक्षी रणवीरच्या प्रेमात पागल झाली होती. अनेकद ते एकत्र स्पॉट झाले होते. दोघांनी मीडिया समोर कधीच खुलून भाष्य केलं नाही. परंतु कायमच ते एकमेकांचं कौतुक करताना दिसायचे. काही दिवस रणवीरच्या सोबत राहिल्यानंतर दोघंही वेगळे झाले.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अजय देवगणचा सिनेमा भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं कलंक आणि दबंग 3 या सिनेमात काम केलं आहे. याशिवाय आलेल्या खानदानी शफाखान या सिनेमातही ती दिसली होती.