सोनमचे मंगळसूत्र पाहिले का?

बॉलिवूडमधील प्रत्येक गोष्टींची चर्चा होते. याचा अनुभव गेल्याच आठवड्यांत सर्व नेटीजन्सना आला असेल. गेल्या आठवड्यात सोनम पाठोपाठ नेहा धुपिया, हिमेश रेशमिया हे विवाह बंधनात अडकले. अर्थात यामध्ये सोनम विशेष भाव खात होती, कारण गुगलच्या ट्रेण्डमध्येही ती टॉपवर होती.  दोन आठवडे गुगल ट्रेडिंगमध्ये भाव खाल्लेल्या सोनम कपूरचे आता मंगळसूत्र देखील चर्चेत आले आहे.

यामागचे कारण असे की, तिने स्वतः तिचे मंगळसूत्र डिझाईन केले आहे. तिची ही कल्पकता बऱ्याच महिला युजर्सच्या पसंतीस उतरली आहे. सोनमची ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे ती उषा देवानी रावतानी यांनी. या मंगळसूत्रामध्ये सोनम आणि आनंद या दोघांच्यानी राशींची चिन्हे आहेत. सोनम ही मिथुन राशीची असून, आनंदची सिंह रास आहे. त्यामुळे या दोघांच्याही राशींच्या चिन्हांना या मंगळसूत्रामध्ये स्थान दिलेले दिसते. त्यात एक सुरेख असा सोलिटेअरचा हिरा या मंगळसूत्राला परिपूर्ण करते. उषा देवानी रावतानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्या वरूनच याची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी या खास मंगळसूत्राविषयी महत्त्वाची माहिती देखील दिली आहे.

 

Loading...
You might also like