एका वर्षानंतर आनंद सोनमला म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर हिने बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्याशी १ वर्षापुर्वी लग्न केले. हे लग्न जिनिव्हामध्ये पार पडले. आता या दोघांच्या लग्नाला १ वर्ष पुर्ण झाली आहे. यानिमित्त तिचे पती आनंद याने सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आनंदने कॅप्शन देखील दिले आहे.

एक वर्षाच सोनमसोबतच्या आठवणींना आनंदने उजाळा दिला. त्याने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोत सोनमने आपल्या पायात वेगवेगळ्या प्रकारचे बुट घातल्याचे दिसत आहे. यासोबत यादोघांचे हात ही दिसत आहे. त्याने फोटोत कॅप्शन दिले आहे की, ‘सोनमचे त्याच्या जीवनात नेमके स्थान काय आणि कसे आहे? अशाप्रकारे भावनांना वाट मोकळी करुन दिली’ या फोटोला युजर्सने खुप कमेंट केल्या. आणि सोनम व आनंदला शुभेच्छा देखील दिल्या.

फोटो शेअर करण्याचे कारण आनंदने सांगितले की, ‘मला शुजचे वेड नाही. तर असे पायाकडे पाहणे मला नेहमी आपण काय आहोत याची जाणीव करुन देते. प्रत्येक गोष्टीप्रती आपण कृतज्ञ असल्याची भावनाही यामुळे स्मरणात राहते.’ पोस्टमध्ये आनंदने सोनमचा उल्लेख ‘guiding star’ म्हणून केला. यानंतर त्याने वैवाहिक आयुष्यात आणि तीन वर्षाचे रिलेशनशिप या सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. त्याचबरोबर सोनम एक मैत्रिण, पाठिंबा देणारी व्यक्ती, समर्थ करणारी सहचारिणी आणि वेळ पडल्यास आपण चुकत असल्यास वेळीच चूक निर्दशनास आणणारी एक व्यक्ती तिची मला चांगली साथ लाभली, असे देखील त्याने म्हटले.