पुन्हा श्रीदेवी चाहत्यांसमोर येणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी एकदम मनाला चटका लावणारी होती. अजून देखिल तिच्या अस्तित्वाची जाणीव होत आहे. अचानक बॉलिवूड मधून निघून जाणारी अभिनेत्रीची आठवण आजही त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यांचे निधन होऊन एक वर्ष झाले असून आजही त्या प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. पुन्हा एकदा त्या चाहत्यांसमोर येणार आहे. त्या कशी ? ते जाणून घ्या…

‘मदर्स डे’ या दिवशी पुन्हा एकदा श्रीदेवी चाहत्यांना पहायला मिळणार आहे. यांचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ हा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतात नव्हे तर चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नहाटा यांनी व्टिटरवर दिली आहे. हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचा निर्णय झी स्टुडीओज इंटरनॅशनल ने घेतला आहे.

https://twitter.com/KomalNahta/status/1113655406268694528

 श्रीदेवी यांचे पती बोनी कपुर यांनी श्रीदेवी यांच्या आठवणी जपून ठेवून त्यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी बनविणार आहे. यासाठी त्यांनी श्री, श्रीदेवी आणि श्रीदेवी मॅम हे तीन टायटल रजिस्टर केले आहे. यामध्ये श्रीदेवी यांचे सर्व रिअल फुटेज वापरण्यात येणार आहे.  त्यामुळे श्रीदेवी यांचे जगणे चाहत्यांसमोर एका वेगळ्याप्रकारे त्यांच्या येणार आहे.