तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वरा भास्करनं दिलं ! ‘रसभरी’ वेब सीरिजमध्ये नेमकं आहे तरी काय ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ओटीटीवर प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईमवर रसभरी ही वेब सीरिज अलीकडेच रिलीज झाली. यानंतर यातील काही सीनवरून वादही झाला. सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. काहींना तर ही सीरिज अजिबात आवडली नाही. आता या सगळ्यावर यातील अभिनेत्री स्वरा भास्करनं भाष्य केलं आहे. सीरिज कशी आहे हे तिनं सांगितलं आहे. यात स्वरा दोन वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

काय आहे स्टोरी ?
मेरठमधील एक लव स्टोरीला या सीरिजमधून दाखवण्यात आलं आहे. स्वरा एक कडक इंग्लिश टीचरच्या भूमिकेत आहे. शाळेतील विद्यार्थी ज्या नाव आहे नंद (आयुष्मान सक्सेना) आहे तो मॅडमकडे आकर्षित होत आहे. यानंतर स्टुडंट आणि मॅडमची स्टोरी आहे, यातही अनेक ट्विस्ट्स आहेत.

सीरिजबद्दल काय म्हणते स्वरा ?
रसभरीबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणते, “डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही सीरिज ताज्या हवेच्या रूपात येत आहे. यात खूप जास्त सामग्री आहे. एकीकडे ही सीरिज मूड हलका करून मनोरंजन करेल तर दुसरीकडे समाजातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांना दाखवण्याचं काम करेल ज्यावर आपण खुलून बोलत नाही.” स्वरा पुढे म्हणते, “ही सीरिज त्यावर बोलत आहे ज्यावर आपण खुलून बोलत नाही. यात किशोर लैंगिकता सारखा मुद्दाही आहे. परंतु हे सगळे मुद्दे खूप मजेदार पद्धतीनं दाखवले गेले आहेत. आशा आहे की, तुम्हाला ही सीरीज आवडेल.”