उर्मिला मातोंडकरचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिनं अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुक आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत उर्मिलानं हातावर शिवबंधन बांधलं आणि नव्या राजकीय कारकीर्दिला सुरुवात केली.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेसाठी उर्मिला मातोंडकर च्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. उर्मिलाची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. परंत त्याआधीच आता उर्मिलानं शिवसेनेत प्रवेश केला आहे.

You might also like