Video : मिल्खा सिंग यांना एअरपोर्टवर पाहून पायाला स्पर्श करत केला नमस्कार ! अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर सुपर अ‍ॅक्टीव असते. गेल्या काही दिवसांपासून तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ अटेंशन घेत आहेत. ती कायमच बिकिनीत दिसत असते. अनेकदा आपल्या फॅशनमुळंही उर्वशी चर्चेत असते. आता उर्वशीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती मिल्खा सिंग यांच्या पाया पडताना दिसत आहे.

उर्वशीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती मिल्खा सिंग यांच्या पायाला हात लावत नमस्कर करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिनं लिहिलं की, स्वत: धावपटू असल्याकारणानं लिजेंड मिल्खा सिंग यांना भेटणं हे अविश्वसनीय आणि चमत्कारी होतं.

उर्वशीनं शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही खूप प्रभावित झाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तर हा व्हिडिओ सोशलवर शेअरही केला आहे.

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती व्हर्जिन भानुप्रिया या सिनेमात दिसली. याशिवाय ती एक डायमंड दा हार लेदे यार या म्युझिक व्हिडिओत आणि पागलपंती सिनेमात दिसली होती. असंही बोललं जात आहे की, ती कार्तिक आर्यनच्या भुल भुलैया 2 या सिनेमात दिसणार आहे. सिंह साहब दी ग्रेट या सिनेमातून तिनं सनी देओलसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता.

You might also like