‘माधुरी’, ‘रेखा’, ‘हेमा’सह ‘या’ 7 अभिनेत्री बॉलिवूडमधील ‘एव्हरग्रीन ब्युटीज’, 50 वर्ष पार करूनही ‘जलवा’

पोलीसनामा ऑनलाइन –फिल्म इंडस्ट्रीतील प्रत्येक अ‍ॅक्ट्रेससाठी पहिलं आव्हान असतं ते म्हणजे आपलं करिअर वाचवणं. काही अ‍ॅक्ट्रेस आपलं स्टारडम कायम ठेवण्यात यशस्वी होतात. काही अ‍ॅक्ट्रेस ग्लॅमरच्या जगात हरवून जातात. आज आपण अशा काही अ‍ॅक्ट्रेसबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि आजही त्यांचं स्टारडम कायम आहे.

1) नीना गुप्ता – आज नीनाचं वय 60 वर्षे आहे तरीही तिचं करिअर आजही ग्रोथ करताना दिसत आहे. 21 फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या आयुष्मान खुरानाच्या शुभमंगल ज्यादा सावधान सिनेमातही ती दिसली होती. चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं होतं. तिला एक मुलगी आहे. तिचं नाव मसाबा गुप्ता आहे जी एक फॅशन डिझायनर आहे.

2) अमृता सिंह – अमृताचं वय 62 आहे. आजही अमृता सिनेमात काम करत आहे. तिं सैफ अली खानसोबत लग्न केलं परंतु नंतर दोघे वेगळे झाले. यानंतर तिनं लग्न केलं नाही. तिला दोन मुलं आहे. घटस्फोटानंतर तिनं दुसरं लग्न केलं नाही. सध्या ती सिंगल मदरचा रोल निभावत आहे.

3) डिंपल कपाडिया – डिंपल देखील 62 वर्षांची आहे. डिंपलनं राजेश खन्नासोबत लग्न केलं होतं. नंतर दोघे वेगळे झाले होते. तिला दोन मुली आहे. ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना. 2012 मध्ये राजेश खन्नाचं निधन झालं. आजही डिंपल सिनेमात काम करते.

View this post on Instagram

Airport Diaries ☺️ ~ 📸 Hamara Photos #dimplekapadia

A post shared by Dimple Kapadia (@dimplekapadia_fanpage) on

4) अर्चना पूरन सिंह – अर्चना 57 वर्षांची आहे. कॉमेडी शो द कपिल शर्मा शोचा ती हिस्सा आहे. अलीकडेच ती हाऊसफुल 4 मध्ये दिसली होती. 1982 साली आलेल्या निकाह सिनेमातून अर्चनानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

5) हेमा मालिनी – ड्रिम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनीला सारेच ओळखतात. आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या हेमा आजही लाईमलाईटमध्ये असतात. आज त्या 71 वर्षांच्या आहेत आणि मथुरेच्या खासदार आहेत.

6) माधुरी दीक्षित – माधुरी 52 वर्षांची आहे. 90 च्या दशकातील सर्वात चर्चित बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आहे. अलीकडेच तिनं डान्स के दीवाने या रिअ‍ॅलिटी शोचं जजिंग केलं. माधुरी 80 आणि 90 च्या दशकातील हाएस्ट पेड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे.

View this post on Instagram

Can do this with my eyes closed

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

7) रेखा – रेखा 65 वर्षांची आहे. तिनं दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजही रेखाचा साडी लुक हेडलाईनमध्ये गाजताना दिसत असतो. अवॉर्ड शोपासून तर टीव्ही शोमध्ये रेखा दिसत असते.

 

You might also like