COVID-19 : ‘कोरोना’ला हरवण्यासाठी अभिनेत्री जोआ मोरानीचं 20 दिवसात दुसरं ‘प्लाझ्मा डोनेशन’ ! इतरांना केलं ‘हे’ आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अॅक्ट्रेस जोआ मोरानी हिनं कोरोना व्हायरसला हरवल्यानंतर आता दुसऱ्या लोकांची मदत करण्याचं ठरवलं असून ती या मिशनवर कामही करू लागली आहे. कोरोनातून पूर्ण पणे ठिक झाल्यानंतर आता जोआनं 20 दिवसात आता दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केलं आहे ज्यामुळं आता इतर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जाऊ शकेल.

जोआनं ट्विटरवरून प्लाझ्मा डोनेशनचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना जोआ म्हणते, “प्लाझ्मा डोनेशन राऊंड 2. गेल्या वेळी यानं एका रुग्णाला आयसीयुमधून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. माझ्या डॉक्टरकडून एक नोट- आशा आहे की, नीट झालेले सर्व रुग्ण मदतीसाठी पुढं येतील.”

जोआनं शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्लाझ्मा डोनेट केल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे.

जोआ मोरानी ही शाहरुख खानचा सुपरहिट सिनेमा चेन्नई एक्सप्रेसचे प्रोड्युसर करीम मोरानी यांची मुलगी आहे. तिचा बहिण शाजा मोरानी आणि वडिल करीम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तिघांनीही यावर मात केली आहे. यातून ठिक झाल्यानंतर तिघांनीही त्यांचा अनुभव सोशल मीडियावरून शेअर केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like