भाईजान सलमाननं लाँच केल्या ‘या’ 12 अभिनेत्री, बनवलं करिअर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –

1) कॅटरीना कैफ (मैंने प्यार क्युं किया) – तसं पाहिलं तर 2003 साली आलेला बूम हा सिनेमा कॅटचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमात तिनं जॅकी श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं होतं. परंतु तिला ओळख मिळाली ती म्हणजे 2005 साली आलेल्या मैनै प्यार क्यु किया या सिनेमातून. या सिनेमात ती सलमान खानसोबत दिसली होती. कॅटनंही कबूल केलं आहे की, तिला सलमान खानमुळेच ओळख मिळाली आहे.
प्रसिद्ध सिनेमे- ज्वेल ऑफ इंडिया, भारत, ठग्स ऑफ हिंदोस्तान

2) जरीन खान (वीर- 2010) – जरीननं 2010 साली आलेल्या वीर या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. तिला डेब्यूसाठी नॉमिनेशनही मिळालं आहे. समलान खाननंच तिला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि लिड रोल दिला होता. 1921, अक्सर 2, हेट स्टोरी 3 हे तिचे काही प्रसिद्ध सिनेमे आहेत.

3) सोनाक्षी सिन्हा(दबंग 2010) – सुरुवातीला कॉस्च्युम डिझायनिंगचं काम केल्यानंतर तिला 2010 मध्ये आलेल्या सलमान खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमा दबंगमधून तिनं डेब्यू केला होता. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अदाकाराचा फिल्म फेअर किताब मिळाला होता. सोनाक्षी सलमान खानला आपला गॉडफादर मानते. कलंक, दबंग 3, खानदानी शफाखाना हे तिचे काही प्रसिद्ध सिनेमे आहेत.

4) अथिया शेट्टी(हिरो) – प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीनं 2015 साली सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा सिनेमा हिरोमधून डेब्यू केला होता. यात तिनं दमदार अभिनय केला होता. मोतीचूर चकनाचूर, नवाबजादे, मुबारकां असे काही तिचे प्रसिद्ध सिनेमे सांगता येतील.

5) डेजी शाह (जय हो) – करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोरियोग्राफर गणेश आचार्यला असिस्ट करणारी आणि अनेक सिनेमात डान्सरची भूमिका साकारणारी डेजी शाहनं आपला डेब्यू कन्नड सिनेमा बॉडीगार्डमधून केला होता. परंतु बॉलिवूडमध्ये तिला 2015 आलेल्या जय हो सिनेमात तिला लिड रोल देत सलमान खाननं लाँच केलं. रेस 3, राम रतन, हेट स्टोरी 3 हे तिचे प्रसिद्ध सिनेमे आहेत.

6) स्नेहा उल्लाल(लकी नो टाईम फॉर लव- 2005) – ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2005 मध्ये समलान खाननं ऐश्वर्यासारखं दिसणाऱ्या स्नेहा उल्लाल हिला लकी नो टाईम फॉर लव या सिनेमातून डेब्यू केला. हा सिनेमा खूप चर्चेत राहिला परंतु फ्लॉप झाला. स्नेहा ऐश्वर्याची जागा घेऊ शकली नाही. स्नेहाचं करिअरही बॉलिवूडमध्ये खास काही पुढे गेलं नाही. साऊथ सिनेमात ती सक्रिय आहे. बजुबान इश्क, इट्स रॉकिंग- दर्द ए डिस्को क्लिक असे तिचे काही प्रसिद्ध सिनेमे सांगता येतील.

7) हेजल कीच (बॉडीगार्ड 2011) – हेजल कीचलाही सलमान खाननं बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. 2011 साली आलेल्या बॉडीगार्ड सिनेमातून तिनं डेब्यू केला आहे. तिला बॉलिवूडमध्ये जास्त यश मिळालं नाही. मॅक्सिमम आणि बॉडीगार्ड असे प्रसिद्ध सिनेमे सांगता येतील.

8) भूमिका चावला (तेरे नाम 2003) – भूमिका चावलाचा तेरे नाम हा पहिला हिंदी सिनेमा होता. या सिनेमात ती सलमान खान सोबत काम करताना दिसली. यासाठी तिला बेस्ट फीमेल डेब्यू झी सिने अवॉर्ड मिळाला आहे. या सिनेमानंतर तिला जास्त यश मिळालं नाही. खामोशी, एम एस धोनी, नाम हे तिचे प्रसिद्ध सिनेमे आहेत.

9) वरीना हुसैन (लवयात्री 2018) – 2018 साली आलेल्या लवयात्री सिनेमातून वरीना हुसैननं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती समलान खानचा जीजू आयुष शर्मासोबत दिसली होती. वरीनाला सलमाननंच लाँच केलं आहे. दबंग 3 लवरात्री असे तिचे काही प्रसिद्ध सिनेमे सांगता येतील.

10) रवीना टंडन (पत्थर के फूल 1991) – रवीना टंडन बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या सुरुवातीला ती मॉडेलिंग करत होती. पत्थर के फूल या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करताना दिसली होती. यासाठी तिला फिल्म फेअरचा लक्स न्यू फेस ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला होता. खानदानी शफाखाना, हनुमान दा दमदार, शब असे तिचे काही प्रसिद्ध सिनेमे सांगता येतील.

11) नगमा ( बागी : अ रिबेल फॉर लव) – 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक नगमानं 1990 साली आलेल्या सलमान खानच्या बागी अ रिबेल फॉर लव या सिनेमातून डेब्यू केला होता. तिने अनेक वर्ष सिनेमात काम केलं आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियों, चल मेरे भाई असे तिचे प्रसिद्ध सिनेमे सांगता येतील.

12) भाग्यश्री (मैने प्यार किया 1989) – अनेक सिनेमा आणि टीव्ही शोधमध्ये आपली ओळख केलेली अभिनेत्री भाग्यश्री हिनं 1989 साली आलेल्या मैने प्यार किया या सिनेमातून डेब्यू केला होता. यासाठी तिला फिल्म फेअरचा बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. जनानी, हमको दीवाना कर गये, मैने प्यार किया हे तिचे प्रसिद्ध सिनेमे आहेत.