‘आम्ही एकाच गोष्टीसाठी लढतोय…’, Ex बॉयफ्रेंडचा कंगनाला पाठींबा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड स्टार कंगना रणौत सतत चर्चेत येताना दिसत आहे. मुंबई महापालिकेनं कंनगाचं ऑफिस तोडल्यानंतर कंगनानं शिवसेनेवर टीका केली होती. यानंतर शिवसेना आणि कंगना यांच्यात कायमच टीका होताना दिसली आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर अनेकांनी शिवसेनेवर टीका केली तर कंगनाविरोधात देखील काही बॉलिवूडमधील मंडळी एकवटली होती. दरम्यान कंगनाला बॉलिवूडमधून दिग्गजांकडून होणाऱ्या विरोधामध्येच तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता अध्ययन सुमन याचा कंगनाला पाठींबा मिळाला आहे.

एका मुलाखतीत बोलताना अध्ययन सुमन म्हणाला, “गेल्या 12 वर्षात आम्ही दोघं सपर्कात नाही आहोत. परंतु आज आम्ही दोघं एकाच कारणासाठी लढत आहोत. मी तिचा आदर करतो आणि हे समजतो की, ती जे काही करत आहे, ज्याप्रकारे इंडस्ट्रीतील लोकांविरोधात बोलत आहे त्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार आहे.”

पुढे बोलताना अध्ययन म्हणाला, “गेल्या 12 वर्षात कंगना आणि माझ्यात काहीही बोलणं झालेलं नाही. ती आज मोठी, प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिनं अशा प्रकारे समाजात येण्याचा निर्णय घेतला आहे तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. तिला पब्लिसिटीची गरज नाहीये. हेच कारण आहे ज्यामुळं ती बोलत आहे. हा पूर्णपणे तिचा निर्णय आहे आणि मी त्याचा आदर करतो.”

अध्ययन असंही म्हणाला, “जसं मी आधीच बोललो आहे की, गेल्या 12 वर्षात आमचा संवाद नाही. परंतु आयुष्यानं आम्हाला अशा वळणावर आणलं आहे जिथं आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही तर एकाच गोष्टीसाठी लढत आहोत. ज्याप्रमाणे माझे वडिल सुशांत सिंह राजपूतला न्याय देण्याची मागणी करत आहेत त्याचप्रमाणे कंगनाही करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like