Video : आदित्य नारायणनं लग्नात केला अनोखा ‘लॅप डान्स’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस सिंगर उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा सिंगर आणि इंडियन आयडल 12 चा होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) यानं आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आदित्य वाजतगाजत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड अ‍ॅक्ट्रेस श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) यांनी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं आहे.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दोघं खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. लग्नाच्या व्हिडिओमधील एक व्हिडिओ सध्या सोशलवर जोरदार चर्चेत असल्याचं दिसत आहे. सोशलवर हा व्हिडिओ खूप वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.

आदित्यचा एक व्हिडिओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात आदित्य अनोखा लॅप डान्स करताना दिसत आहे. ढोलवर बसून आदित्य डान्स करत आहे. सध्या त्याच्या या व्हिडिओची खूप चर्चा होताना दिसत आहे.

आदित्य आणि श्वेता यांनी मुंबईच्या जुहूमधील इस्कॉन टेंपलमध्ये 7 फेरे घेतले. घरातून नाचत गात वरात घेऊन जाणारा आदित्या लग्नावेळी खूप उत्सुक दिसत होता.

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.