लता मंगेशकरांच्या आवाजावरून ट्रोलर्स करत होते टिप्पणी, सिंगर अदनान सामीनं घेतला समाचार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – फेमस इंडियन सिंगर अदनान सामी (Adnan Sami) यानं अलीकडेच दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar), नूर जहाँ (Noor Jehan) आणि आशा भोसले (Asha Bhosle) यांचा एक शानदार आणि न पाहिलेला फोटो शेअर केला होता. हा फोटो आयकॉनिक आणि हिस्टॉरिक असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. हा फोटो समोर आल्यानंतर अनेक युजर्स यावर प्रतिक्रिया देऊ लागले. काही युजर्ननं मात्र लता मंगेशकर यांच्या बद्दल अशा काही प्रतिक्रिया दिल्या ज्या पाहिल्यानंतर अदनान सामी खूप नाराज झाला. ट्रोलर्सनं लता मंगेशकर यांना ओव्हररेटेड आणि दुसऱ्यांचं करिअर संपवणाऱ्या म्हणून संबोधलं.

एका युजरनं लता मंगेशकर यांच्यावर कमेंट करत सांगितलं की, लता मंगेशकर यांच्याकडे शानदार आवाज आहे असं सांगून भारतीयांचं ब्रेनवॉश करण्यात आलं. आणखी एका युजरनं लिहिलं की, भारतीयांना हे मान्य करण्यासाठी मजबूर करण्यात आलं की, लता मंगेशकर यांच्या आवाजात जादू आहे. त्यांचा आवाज खूप बिघडलेला आणि खूप जास्त वापरण्यात आलेला आहे. हे पाहून अदनान खूप नाराज झाला आणि त्यानं सोशलवरच ट्रोलर्सचा समाचार घेतला.

या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना अदनान सामी म्हणाला, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. मुर्ख दिसण्यापेक्षा हे बरं आहे की, जर तुम्हाला शंका असेल तर काही बोलण्याऐवजी गुप्प बसावं.

यानंतरही ट्रोलर्सचं लता मंगेशकर यांच्यावरून कमेंट करणं सुरूच होतं. एकानं लिहिलं की, मला आनंद आहे की, लता मंगेशकर यांनी उमराव जानसाठी त्यांचा आवाज दिला नाही. पाकिजापर्यंत माझ्यासाठी त्या तेवढ्या वाईट नव्हत्या. त्यामुळं मला जास्त काही फरक नाही पडला. मी दोन्ही सिनेमांच्या OST ची फॅन आहे.