आफताब शिवदासानीच्या घरी आली ‘छोटी परी’, पत्नी निन दुसांज सोबत केलं पहिल्या बाळाचं स्वागत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी वडील झाले आहेत. त्यांची पत्नी निन दुसांज यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. दोघेही पहिल्या बाळाचे पालक बनले आहेत. त्यांनी ही चांगली बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितली आहे आणि आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.

बाळाची पहिली झलक दाखवत आफताबने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘थोडासा स्वर्ग पृथ्वीवर पाठवला गेला आहे… देवाच्या आशीर्वादाने @nin_dusanj आणि मी आमच्या मुलीच्या जन्माची घोषणा करतो… आता आमचे तीन जणांचे कुटुंब झाले आहे.’

 

 

आफताब शिवदासानी आणि निन दुसांज यांनी 2014 मध्ये खासगी समारंभात एक-दुसऱ्याचा हात पकडला. यानंतर तीन वर्षांत दोघांनी श्रीलंकेत दुसऱ्यांदा धुमधडाक्यात लग्न केले होते.

 

 

 

 

 

नवीन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा

आफताबने मस्त, कसूर, लव के लिए कुछ भी करेगा आणि मस्ती व्यतिरिक्त अनेक चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या नवीन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे.

 

 

 

 

आफताब शिवदासानी आणि त्यांची पत्नी निन दुसांज शिवदासानी यांनी नुकतीच त्यांची प्रॉडक्शन कंपनी माउंट झेन मीडियाची घोषणा केली. या कंपनीमध्ये चित्रपट, ऑनलाइन शो आणि डॉक्यूमेंट्रीच्या निर्मितीचे काम होईल.

 

 

 

 

या चित्रपटापासून करतील बॅनरचा शुभारंभ

आफताब लवकरच ‘धुंध’ या चित्रपटापासून आपले नवीन बॅनर लाँच करणार आहेत. त्यांनी मंगळवारी आपल्या इंस्टाग्रामवर जाहीर केले की ते आपली पत्नी निन दुसांज यांच्यासह आपल्या बॅनरचा पहिला चित्रपट ‘धुंध’ साठी तयार आहेत. ऑक्टोबरपर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची आफताब यांची योजना आहे. मात्र त्यांनी कलाकारांचा खुलासा केलेला नाही.