अनुष्का शर्मानंतर आता विद्या बालनं बनली प्रोड्युसर, शेअर केला ‘नटखट’ या शॉर्ट फिल्मचं फर्स्ट पोस्टर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मानं नुकतीच एक वेब सीरिज प्रोड्युस केली आहे जिचं नाव आहे पाताल लोक. सध्या ही सीरिज सर्वांना आवडताना दिसत आहे. यानंतर आता अभिनेत्री विद्या बालन ही प्रोड्युसर बनली आहे. विद्यानं तिच्या पहिल्या नटखट या शॉर्ट फिल्मचं पोस्टर रिलीज केलं आहे.

विद्यानं नुकतंच तिच्या इंस्टावरून नटखट या शॉर्ट फिल्मचं पोस्ट शेअर केलं आहे. पोस्ट शेअर करताना तिनं खास असं कॅप्शनही दिलं आहे. विद्या म्हणते, “एक कहानी सुनोगे….? प्रोड्युसर आणि अॅक्टर म्हणून माझ्या पहिल्या शॉर्ट फिल्मचा फर्स्ट लुक प्रेझेंट करत आहे. नटखट. नटखट शॉर्ट फिल्मची टॅगलाईन आहे- एक कहानी सुनोगे…?”

पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर यात विद्या बालनं एकदम देसी लुकमध्ये दिसत आहे. विद्या एका लहान मुलाच्या डोक्याची तेल मालिश करत आहे. ती जरी मुलाची मालिश करत असली तरी तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच कुठे तरी आहे.

ही शॉर्ट फिल्म शान व्यासनं डायरेक्ट केली आहे. याशिवाय रोनी स्क्रूवाला आणि विद्या बालन मिळून याची निर्मिती करत आहेत. चाहते आता याच्या ट्रेलरची वाट पहात आहे.

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एनटीआरच्या बायोपिकमध्ये एनटीआरच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच बसवतारकम नंदमुरी ही भूमिका साकारणार आहे. यासाठी तिनं वजनही वाढवलं आहे. याशिवाय ती शकुंतला देवी या बायोपिक सिनेमातही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती अक्षय कुमार सोबत मिशन मंगल या सिनेमात दिसली होती. 15 ऑगस्ट 2019 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.