आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’आधी थिएटर मध्ये येणार ‘उजडा चमन’ ! पहिलं पोस्टर रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षकांनाही हा ट्रेंड खूप आवडत आहे असे दिसत आहे. प्रेक्षकही असे सिनेमे थिएटरमध्ये जाऊन पहात आहेत. या ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर दिसत आहे तो म्हणजे नॅशनल अवॉर्ड विजेता आयुष्मान खुराना. जो नेहमी वेगळे विषय असणारे सिनेमे घेऊन येत असतो. परंतु असे वाटत आहे आयुष्मानचा हा ट्रेंड यावेळी चालणार नाही. आयुष्मान खुरानाचे सिनेमे असे असतात ज्यात नेहमी वेगळे, मजेदार आणि नवीन विषय असतात. परंतु पुरुषांच्या टक्कल पडण्याच्या समस्येवर असलेला आयुष्मानचा बाला हा सिनेमा उजडा चमन सिनेमाशी भिडू शकतो.

प्यार का पंचनामा 2 मध्ये दिसलेला अभिनेता सनी सिंह स्टारर उजडा चमन सिनेमाचा पहिलं पोस्टर समोर आलं आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये सनी अर्धवट टकला दिसत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत मानवी गगरू, करिश्मा शर्मा आणि ऐश्वर्या सखूजा दिसणार आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाच्या पोस्टरवरून लक्षात येत आहे की, हा सिनेमाही पुरुषांच्या टक्कल पडण्याच्या विषयावर आहे.

https://youtu.be/1Bqx7gx6RKo

आयुष्मान खुराना लवकरच बाला सिनेमात दिसणार आहे. ही अशा तरुणाची गोष्ट आहे जो टक्कल पडण्याच्या समस्येने ग्रस्त आहे. या सिनेमाचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. हा सिनेमा 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. विशेष बाब अशी की, हाऊसफुल 4 या सिनेमात अक्षय कुमारदेखील टकला दिसणार आहे. इतकेच नाही तर, त्याच्या भूमिकेचंही नाव बाला आहे.

Visit : Policenama.com